IPL 2021 : IPLचा आणखी एक सामना रद्द ! ‘या’ टॉपच्या संघाने खेळण्यास दिला नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या या वर्षीच्या स्पर्धेवर कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) या दोन संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर संघ व्यवस्थापनाने उद्याचा (दि.5) सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB) यांच्यात बुधवारी (दि.5) होणारा सामना रद्द करण्यात आला आहे.

चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनाने उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. लक्ष्मीपती बालाजी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेले संघातील खेळाडूंना पुढील तीन चाचण्या जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत संघ सामना खेळू शकत नाही, अशी भूमिका चेन्नई सुपरकिंग्ज संघाने घेतली आहे. संघाच्या खेळण्याबाबतचे चित्र स्पष्ट होण्यास पुढील सहा दिवसांचा कालावधी लागेल असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर होणारा चेन्नई विरुद्ध राजस्थान या संघातील बुधवारी होणारा सामना कोरोना प्रतिबंधक नियमानुसार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार आहेत. त्यांची दैनंदिन कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.