IPL 2021 : KKR च्या शुबमन गिलनं दाखवला ‘ट्रेलर’, जाणून घ्या नेमकं काय केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेट चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी आयपीएल देणार आहे. पुन्हा एकदा चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. तत्पूर्वी खेळाडूही सराव सामन्यांत फटकेबाजी करताना दिसत आहेत. आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात व्हायला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.

भारताचा युवा फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders), शुबमन गिल ( Shubman Gill) यानं सराव सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्यानं ३५ चेंडूंत ७६ धावा चोपल्या. KKRचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्ध होणार आहे. टीम पर्पल व टीम गोल्ड अशा दोन संघांमध्ये हा सराव सामना खेळवण्यात आला.

गोल्ड संघाचे प्रतिनिधित्व करताना गिलनं ३ षटकार व ११ चौकार मारून पर्पल संघाचे ८८ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केले. ४१ सामन्यांत ३३.५३च्या सरासरीनं ९३९ धावा. ७ अर्धशतकं, ८७ चौकार व २४ षटकार कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ ( IPL 2021 KKR full squad) – इयॉन मॉर्गन ( कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर्स, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नरीन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, पवन नेगी, टीम सेईफर्ट, शकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटींग, वेंकटेश अय्यर.