‘या’ 6 शहरांमध्ये होणार सामने, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी Bad News

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणानंतरही वानखेडे स्टेडियमवर सामन्यांसाठी परवानगी दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात होणारी एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना होईल आणि त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्र सरकारने प्रेक्षकांना परवानगी दिलेली नाही. आयपीएलचा हा हंगाम एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार असून ११ एप्रिलपासून याची सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने सहा शहरांची निवड केली आहे. यावेळी मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली येथे आयपीएल सामन्यांचे आयोजन होणार आहे. मुंबई मात्र प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय आयपीएल सामन्यांचे आयोजन होणार आहे. या वेळी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे तीन संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळू शकणार नाहीत. आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी नेमलेल्या सहा शहरांपैकी अहमदाबाद हे एकमेव असे शहर आहे की ज्यांचा कोणताही फ्रँचायझी संघ नाही. उर्वरित पाच शहरे फ्रँचायझी संघ आहेत. जी त्यांच्या घरच्या मैदानावर सामने खेळण्यास सक्षम असतील. या वेळी आयपीएलचे सामने आठ ऐवजी सहा शहरांमध्ये होऊ शकता. स्थानिक क्रिकेटमुळे हैदराबादला होस्टिंग शहरांमध्ये स्थान देण्यात आले नाही आणि अखेर दिल्लीला यजमान शहरांच्या यादीत स्थान देण्यात आले.

प्रेक्षकांना काही राज्यांमध्ये सामन्यादरम्यान परवानगी दिली जाणार नाही, तर काही राज्यात स्टेडियमच्या क्षमतेनुसार ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल. बीसीसीआयने यावर निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आयपीएल फ्रँचायझींनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने सांगितले की, एक-दोन राज्यात हे आयोजन करणे योग्य झाले असते. २०२० चा हंगाम तीन ठिकाणी झाला आणि तो दृष्टिकोन योग्य होता. आठ संघांना गटात विभागले जावे, असा प्रस्ताव बीसीसीआयने ठेवला आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, आम्हाला होम ग्राऊंडमध्ये सर्वाधिक सपोर्ट मिळतो. अशा परिस्थितीत जेव्हा आपण आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळत नाही तेव्हा प्ले ऑफसाठी पात्र ठरणे कठीण होईल. त्याचबरोबर, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचा संघ ६ शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या बाजूने नाही, अशी बातमीही माध्यमांमधून समोर येत आहे.