IPL दरम्यान MS Dhoni ला मोठा धक्का ! आई-वडील आढळले कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

रांची : पोलीसनामा ऑनलाइन –   टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आई आणि वडील दोघे कोरोना संक्रमित आढळले आहेत. धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. बुधवारी महेंद्र सिंह धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांना रांचीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, धोनीच्या आई-वडीलांची स्थिती सामान्य आहे. त्यांची ऑक्सीजन लेव्हल ठीक आहे. पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनुसार, दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत संसर्ग पोहचलेला नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की, काही दिवसात धोनीचे आई-वडील बरे होतील आणि संसर्गातुन मुक्त होतील.

धोनीचे वडील पान सिंह 1964 मध्ये रांची येथील मेकॉनमध्ये ज्यूनियर पादावर नोकरी मिळाल्यानंतर झारखंडमध्ये राहू लागले. भारतात मागील 24 तासात 2 लाख 95 हजार पेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि 2 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यात 22 एप्रिलच्या सकाळी 6:00 वाजेपासून 29 एप्रिलच्या सकाळी 6:00 वाजेपर्यंत लॉकडाऊनसारखे प्रतिबंध लावले आहेत.