फॅफ ड्यू प्लेसिस अन् ख्रिस गेल यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय ! जाणून घ्या कोणाचं वाढलं ‘टेन्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीसीसीआयनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL ) १४ व्या पर्वाचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर चा मुहूर्त गाठला आहे. २९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत यूएईत ( UAE) खेळवण्याचा विचार सुरू आहे.

बीसीसीआयनं २५०० कोटींचं नुकसान टाळण्यासाठी UAEत सप्टेंबर-ऑक्टोबरची सामने खेळवण्यासाठी तयारी केली आहे. मात्र, या स्पर्धेत परदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी अजूनही चिंतेचं वातावरण आहे. त्यात पंजाब किंग्सचा ख्रिस गेल, चेन्नई सुपर किंग्सचा फॅफ ड्यू प्लेसिस आणि कोलकाता नाईट रायडर्सचा शाकिब अल हसन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे CSK, PBKS व KKR यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल, बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अन् दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ड्यू प्लेसिस यांनी आगामी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. CPL 2021 चे पर्व २८ ऑगस्ट व १९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे हे तीन स्टार खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. गेल हा सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स संघात परतला आहे. त्यानं २०१७ व २०१८ मध्ये या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. पहिल्याच वर्षी गेलनं संघाला विजेतेपद पटकावून दिले होते. गेलनं ४२४ ट्वेंटी-२० सामन्यांत २२ शतकं व ८६ अर्धशतकांसह १३,८९८ धावा केल्या आहेत. त्यानं १०७३ चौकार व १०१७ षटकार खेचले आहेत.

२०१६ व २०१७ नंतर शाकिब पुन्हा थलाव्हास संघाकडून खेळताना दिसणार आहे. शाकिब CPLच्या यंदाच्या पर्वात जमैका थलाव्हास संघाकडून खेळणार आहे. शाकिबनं ३२० ट्वेंटी-२० सामन्यांत ५११८ धावा केल्या आहेत. त्यात ४७६ चौकार व १२१ षटकारांचा समावेश आहे. त्यांनी ३६२ विकेट्सही घेतल्या आहेत आणि ६ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. ड्यू प्लेसिस सेंट ल्युसिया झौक्स संघाकडून खेळेल. प्लेसिसचे CPL मधील हे दुसरे पर्व आहे. याआधी २०१६ मध्ये त्यानं सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. ड्यू प्लेसिसनं २४७ सामन्यांत ६२५० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व ४१ अर्धशतकांचा समावेश आहे.

 

Also Read This : 

 

LPG बुकिंगच्या नियमात मोठा बदल होणार; कोणत्याही एजन्सीकडून आता घेता येऊ शकता सिलिंडर, , जाणून घ्या कसं

 

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

 

योगगुरु बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केली तक्रार

 

बडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

 

तेलगंणातील नक्षल कमांडरचा कोरोनामुळे मृत्यु ! मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणामधील अनेक नक्षलवाद्यांना Covid-19ची लागण?

 

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या