Homeक्रीडाIPL 2022 | CSK ने केला रैनाचा पत्ता कट तर ऋतुराजची 'चांदी',...

IPL 2022 | CSK ने केला रैनाचा पत्ता कट तर ऋतुराजची ‘चांदी’, धोनीसोबत केला स्पेशल करार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IPL 2022 आधी सगळ्या टीमनी त्यांचे अंतिम खेळाडू निश्चित केले आहेत. 30 नोव्हेंबर ही रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा करण्याची अंतिम तारीख आहे. IPL 2022 रिटेनशनच्या (Retention) नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात 2 भारतीय आणि 2 परदेशी किंवा 3 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू असू शकतो. आयपीएल 2021 ची चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पहिल्या मोसमापासून टीमसोबत असलेल्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) यावेळी पत्ता कट केला आहे. आयपीएल 2020 साली रैनाने अखेरच्या क्षणी आयपीएलमधून माघार घेतली, तर आयपीएल 2021 मध्ये रैना संघर्ष करताना दिसला. रैनाचा खराब फॉर्म बघून अखेर धोनीने त्याला टीम बाहेर केले.

 

चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना रिटेन केलं आहे. तर चौथा खेळाडू म्हणून मोईन अलीसोबत (Moeen Ali) चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आयपीएलचा पुढचा मोसम भारतातच खेळवला जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऑफ स्पिनर आणि ऑलराऊंडर असलेल्या मोईन अलीला टीममध्ये ठेवण्यासाठी सीएसके इच्छुक आहे. मोईन अलीने जर सीएसकेसोबत राहण्यास नकार दिला तर सॅम करन (Sam Curran) चेन्नई सुपर किंग्सचा रिटेन केलेला चौथा खेळाडू असणार आहे. (IPL 2022)

 

आपण अखेरचा आयपीएल सामना चेन्नईमध्येच खेळू, असं धोनीने काहीच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. ‘मी माझ्या क्रिकेटचं प्लानिंग कायमच केलं आहे. मी माझी शेवटची वनडे रांचीमध्ये खेळलो, माझा अखेरचा टी-20 सामनाही चेन्नईत असेल, अशी आशा आहे असे धोनी म्हणाला होता.चार खेळाडू टीममध्ये कायम ठेवले तर लिलावामध्ये नवे खेळाडू विकत घ्यायला पैसे कमी पडतील अशी भीती संघाना आहे.

 

चेन्नईने रिटेन केलेले खेळाडू

एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली/सॅम करन

 

Web Title :- IPL 2022 | CSK cuts Raina’s address while Rituraj’s ‘silver’, special deal with Dhoni!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News