IPL 2022 | आयपीएल सामने खेळवले जाणाऱ्या स्टेडिअमची दहशतवाद्यांकडून खरच रेकी झाली?, मुंबई पोलिसांनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL 2022 | आयपीएल सुरू होण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अशातच मुंबईमधील स्टेडिअम आणि खेळाडूंचा जाण्याचा मार्ग आणि त्यांची राहण्याचे हॉटेल्स यांची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची वृत्त प्रसारित झाली होती. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशातच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत मोठा खुलासा केला आहे.

 

आयपीएल (IPL 2022) क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे (Wankhede Stadium) आणि ब्रेबॉर्न स्टेडीयम (Brabourne Stadium) येथील मैदानावर दिनांक 26 तारखेपासून सुरु होत आहेत. आयपीएल (IPL 2022) क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडुन आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडुन (Terrorist) हॉटेल ट्रायडेंट (Hotel Trident), वानखेडे स्टेडीयम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडीयमपर्यंतच्या मार्गांची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नसल्याचं मुंबई पोलसांनी सांगितलं आहे.

 

आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडीयमदर, हॉटेलवर आणि मार्गावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त मुंबई पोलिसांकडुन पुरविण्यात येत आहे,
असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढलं आहे.
आयपीएल चालू होण्यासाठी दोन दिवस असून क्रिकेट चाहत्यांनाही आयपीएलची उत्सुकता लागली आहे.

 

दरम्यान, खबरदारी म्हणून 26 मार्च ते 22 मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक
आणि राज्य राखीव पोलीस दलही बंदोबस्तासाठी असणार असल्याची माहिती समजत आहे.

 

Web Title :- IPL 2022 | ipl 2022 no reports of terrorists did recce of wankhede stadium mumbai indians and other players hotels clarifies mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray-Sharad Pawar | CM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी एकास चोपले

 

Pune Crime | बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरुन एकाला बेदम मारहाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांवर FIR

 

Former MLA Mohan Joshi | भाजपमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे पुण्याचे विमानतळ धोक्यात – माजी आमदार मोहन जोशी