IPL 2022 | मुंबई इंडियन्समधून पांड्या बंधूचा पत्ता कट, तीन खेळाडू करणार रिटेन चौथ्यासोबत बोलणी सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IPL 2022 च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने पांड्या बंधूंना धक्का देत त्यांना रिटेन न करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 प्रत्येक टीमना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला (BCCI) द्यावी लागणार आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू असू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कायरन पोलार्डसोबत (Kieron Pollard) टीमची बोलणी सुरू आहेत. तर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) लिलावातून विकत घेण्यासाठी आग्रही आहे. याशिवाय मुंबईची टीम ईशान किशनलाही (Ishan Kishan) रिटेन करण्याची शक्यता जास्त आहे.

 

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली,
पण 2021 च्या मोसमात मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नाही.
हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचा फॉर्म मुंबईच्या या कामगिरीचं प्रमुख कारण ठरला.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या,
कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी मुंबई इंडियन्सच्या कामगिरीमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती. (IPL 2022)

 

खेळाडू रिटेन करण्याचे नियम खालीलप्रमाणे

१) जर एखाद्या टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागतील.

२) जर एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.

३) जर एखाद्या टीमने दोन खेळाडू कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी मोजावे लागणार आहे.

४) जर एखाद्या टीमने एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.

 

Web Title :- IPL 2022 | ipl 2022 players retention mumbai indians to release pandya brothers bumrah rohit to be retained

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Europe Corona | युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! जर्मनीत आतापर्यंतचे सर्वाधिक 73 हजारांहून नवीन कोराना बाधित

Indian Digital Bank | देशात स्थापन करणार डिजिटल बँक, नसेल कोणतीही ब्रँच, नीती आयोगाने ठेवला प्रस्ताव

Pune Crime | जुन्नर तालुक्यातील अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास पूर्ण, IG मनोज लोहिया यांची माहिती