मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएलच्या (IPL 2022) पुढील सिझनसाठी लवकरच मेगा ऑक्शनला (Mega Auction) सुरुवात होणार आहे. पण या अगोदर आयपीएलमधील (IPL 2022) जुन्या टीमना रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी 30 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयकडे (BCCI) सादर करावी लागणार आहे. यामुळे आता आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी त्यांची यादी फायनल करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आपला पहिला रिटेन खेळाडू निवडला आहे. राजस्थाननं त्यांचा आयपीएल 2021चा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला रिटेन केले आहे.
संजूला 2018 साली राजस्थानने 8 कोटींमध्ये करारबद्ध केले होते. त्याला मागील सिझनपूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार करण्यात आले. संजू सॅमसनने आयपीएलच्या मागील सीझनमध्ये 137 च्या स्ट्राईक रेटनं 484 रन केले होते. राजस्थान रॉयल्सचे बाकी तीन जागांसाठी जोस बटलर (Jos Buttler), जोफ्रा आर्चर (Jofra Archer) लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्याशी बोलणे सुरु आहे. (IPL 2022)
जोफ्रा आर्चरनं आयपीएल 2020 मध्ये ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ पुरस्कार जिंकला होता. पण दुखापतीमुळे त्याला मागील सिझन खेळता आला नाही. तसेच टी20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या जोस बटलरला (Jos Buttler) राजस्थान रिटेन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण ऑल राऊंडर बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) बाबतीत टीमने अजून कोणता निर्णय घेतला नाही. बेन स्टोक्सने मानसिक कारणांमुळे बराच काळ ब्रेक घेतला होता. तो नुकताच इंग्लंड (England) टीममध्ये परतला आहे. बेन स्टोक्सचे भवितव्य स्टोक्सचा फिटनेस तसंच राजस्थान रॉयल्स त्याला किती रक्कम ऑफर करते यावर ठरणार आहे.
Web Title :- IPL 2022 | ipl 2022 rajasthan royals retain captain sanju samson for the next season
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Malaika Arora | रेड कार्पेटवर मलाईका अरोरा झाली चक्क Oops Moment, फोटो व्हायरल
MP Supriya Sule | ‘मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल’