नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL 2022 | इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2022) सीझन भारतातच होणार आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) उच्च सूत्रांकडून याबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा आयपीएलचा रणसंग्राम (IPL 2022) भारतात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र यादरम्यान वाढत्या कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे आयपीएल यूएई किंवा इतर कोणत्याही देशात आयोजित केली जाऊ शकते, असं यापुर्वी सांगितलं होतं. मात्र त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आयपीएलचा (IPL 2022) पुढील सीझन अनेक अर्थाने खास असणार आहे, कारण त्यात 10 संघ सहभागी होणार आहेत.
लखनौ आणि अहमदाबादचे संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. आयपीएलचा शेवटचा मोसम खूपच रोमांचक होता.
यामध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून सर्वांना आश्चर्य चकित केले.
अनेक खेळाडूंना टीम इंडियातही स्थान मिळाले आहे. गेल्या वेळी चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.
यावेळीही ट्रॉफीसाठी रोमांचक लढत होणार आहे.
दरम्यान, यंदा आयपीएलचे आयोजन यावेळी फक्त मुंबईत (Mumbai) होणार आहे.
आवश्यकता भासल्यास पुण्यात (Pune) आयपीएलचे सामने आयोजित केले जातील, अशी देखील माहिती सूत्रांकडून देण्यात आले आहे.
Web Title :- IPL 2022 | IPL 2022 will be conducted in india all matches will be played in mumbai and pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8 हजार 246 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी