IPL 2022 Mega Auction | वीरेंद्र सेहवागने केली मोठी भविष्यवाणी ! सांगितले कोण विकले जाणार सर्वात जास्त किंमतीत आणि कुणाला मिळू शकते कर्णधारपद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL 2022 Mega Auction | भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ने 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार्‍या आयपीएल 2022 मेगा लिलावा (IPL 2022 Mega Auction) साठी पाच अशा भारतीय खेळाडूंना निवडले आहे ज्यांच्याबाबत त्याचे म्हणणे आहे की, ते सर्वात जास्त मागणी असलेले खेळाडू असतील.

 

सेहवाग म्हणाला की, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि इशान किशन (Shikhar Dhawan, Shardul Thakur, Shreyas Iyer, Yuzvendra Chahal and Ishan Kishan) हे मेगा लिलावातील सर्वात महागडे खेळाडू (expensive players) असू शकतात आणि अनेक फ्रँचायझी त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील.

 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत सेहवाग म्हणाला, मी आयपीएल लिलावासाठी काही मुद्देही काढले आहेत.
वाटलं ते तुमच्याशी शेअर करावेत. मी अशा 5 भारतीय खेळाडूंची निवड केली आहे,
ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल आणि जे कदाचित सर्वात महाग विकले जातील. (IPL 2022 Mega Auction)

तो म्हणाला, पहिल्या क्रमांकावर शिखर धवन आहे, त्यानंतर शार्दुल ठाकूर, त्यानंतर श्रेयस अय्यर.
यानंतर चौथ्या क्रमांकावर युजवेंद्र चहल आणि पाचव्या क्रमांकावर इशान किशन आहे.
मला वाटते की या 5 भारतीय खेळाडूंकडे या लिलावात सर्वांचे लक्ष असेल.

 

सर्वात महागड्या भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त, 104 कसोटी सामने खेळलेल्या या दिग्गजाने लिलावादरम्यान सर्वाधिक मागणी असणार्‍या परदेशी खेळाडूंचीही नावे दिली आहेत.
वीरेंद्र सेहवाग परदेशी खेळाडूंची नावे निवडताना म्हणाला,
माझ्या मते डेव्हिड वॉर्नर, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स (David Warner, Trent Boult, Jason Holder, Mitchell Marsh and Pat Cummins) असे खेळाडू आहेत.
ज्यांच्यावर पैशांचा पाऊस होऊ शकतो.
माझ्या मते, हे 5 खेळाडू आहेत ज्यांच्यावर 10 पैकी 10 फ्रँचायझींची नजर असेल.

 

त्याच वेळी, माजी फलंदाज सेहवागने फ्रँचायझीला कर्णधाराचा पर्याय (captain option) सुचवला असून,
यावेळी श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन किंवा दिनेश कार्तिक (Shreyas Iyer, Shikhar Dhawan, R Ashwin or Dinesh Karthik) हे भारतीय खेळाडू कर्णधार होऊ शकतात.
त्याचबरोबर सेहवागने परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, जेसन होल्डर, पॅट कमिन्स, फाफ डू प्लेसिस आणि अ‍ॅरॉन फिंच (David Warner, Jason Holder, Pat Cummins, Faf du Plessis and Aaron Finch) यांची निवड केली आहे.

 

Web Title :- IPL 2022 Mega Auction | ipl auction 2022 virender sehwag made a big prediction told who will be the most expensive and who can get the captaincy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा