IPL 2022 Team Auction | अहमदाबाद आणि लखनऊ संघ खेळणार आयपीएल, BCCI ला मिळाले 12 हजार कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL 2022 Team Auction | आयपीएलच्या 2 नवीन संघांची घोषणा झाली आहे. सोबतच 2022 पासून आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ एकमेकाविरुद्ध खेळताना दिसतील. हे संघ अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) आहेत. लिलावामध्ये (IPL 2022 Team Auction) अहमदाबादला सीव्हीसी कॅपिटल (CVC Capital) ने 5200 कोटीमध्ये तर लखनऊला आरपी संजीव गोयंका ग्रुप (RP Sanjiv Goenka Group) ने 7090 कोटी रुपयात खरेदी (IPL 2022 Team Auction) केले.

या दोन्ही नवीन संघांच्या लिलावातून बीसीसीआय (BCCI) ला जवळपास 12,290 हजार कोटी रुपये मिळाले. क्रिकइन्फोसोबत बोलताना संजीव गोयंका यांनी म्हटले की, आयपीएलमध्ये परतल्याने आनंद झाला आहे. ही तर सुरूवात आहे. आम्ही चांगला संघ तयार करू. यापूर्वी ग्रुपने पुण्याच्या टीमची खरेदी केली होती. टीम 2016 आणि 2017 मध्ये आयपीएलमध्ये खेळ सुद्धा केला होता.

आयपीएलच्या दोन संघांसाठी शर्यतीत 6 शहरे
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 10 संघ खेळणार नसून 2011 मध्ये सुद्धा आयपीएलमध्ये 10 संघ खेळतील. त्यावेळी कोच्ची टस्कर्स केरळा आणि पुणे वॉरियर्स नावाची फ्रेंचायजी लीगचा भाग बनली होती. आयपीएलच्या दोन संघांसाठी शर्यतीत 6 शहरे होती. यामध्ये अहमदाबाद, लखनऊ, कटक, गुवाहाटी, धर्मशाला आणि इंदौरचे नाव होते. मात्र, सर्वात मजबूत दावेदार अहमदाबाद होता.

याचे मोठे कारण तिथे यावर्षी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार झाले होते. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाखापेक्षा जास्त आहे. याशिवाय लखनऊचे नाव सुद्धा या यादीत सर्वात पुढे होते. या शहरात सुद्धा जागतिक स्तरावरील स्टेडियम आहे.

22 उद्योजक घराण्यांनी दाखवली उत्सुकता
दोन संघ खेरदी करण्यासाठी एकुण 22 औद्योगिक घराण्यांनी आणि कंपन्यांनी उत्सुकता दाखवली होती. या सर्वांनी टेंडर डॉक्यूमेंट खरेदी केले होते. बोली लावणार्‍यांमध्ये अदानी ग्रुप, इंग्लिश फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंब, टोरेंट फार्मा, अरबिंदो फार्मा, माजी मंत्री नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टीलसह अनेक प्रायव्हेट इक्विटीसंबंधी लोक सहभागी होते.

एकेकाळी माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे नियोजन पहाणारी रिती स्पोर्टने सुद्धा आयपीएलच्या दोन नवीन फ्रेंचायजीपैकी एकासाठी बोली लावली होती.

बीसीसीआयने 2 वेळा वाढवली तारीख
बीसीसीआयने दोन नवीन आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी ज्या अटी जारी केल्या होत्या,
त्यामध्ये म्हटले होते की, गुंतवणुकदार दोन्ही संघ खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतात.
परंतु शेवटी तो एकच संघ खरेदी करू शकत होता. (IPL 2022 Team Auction)

अगोदर बीसीसीआयने बीड उघडण्याचा दिवस 17 ऑक्टोबर ठरवला होता.
परंतु यामध्ये उशीर झाला. कारण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नवीन संघ खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांचा प्रतिसाद पाहता
अगोदर दोन वेळा 10 ऑक्टोबर आणि नंतर 20 ऑक्टोबरला टेंडर डॉक्युमेंट खरेदी करण्याची डेडलाईन वाढवली होती.
मात्र, आज दुबईत बीडिंग प्रक्रिया पूर्ण झाली.

 

Web Title :- IPL 2022 Team Auction | cricket ipl 2022 team auction lucknow and ahmedabad 2 new ipl teams 10 teams will paly from next season

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire | पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; अग्नीशमनचे 14 बंब घटनास्थळी दाखल

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 889 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Winters Superfood | आला हिवाळ्याचा हंगाम ! आजारांपासून बचाव करायचा असेल तर खाण्यास सुरूवात करा ‘हे’ 10 सुपरफूड