IPL 2022 | आयपीएलसाठी BCCI चा मोठा निर्णय ! सर्व सामने मुंबईत होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL 2022 चे आयोजन मुंबईत (Mumbai) होणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) गुरुवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत एकापेक्षा अधिक स्टेडियम्स उपलब्ध आहेत. तसेच अन्य सुविधा असल्यामुळे एकाच शहरात आयपीएल 2022 (IPL 2022) चे सामने घेण्याबाबत एकमत झाले आहे. याची अधिकृत घोषणा 20 फेब्रुवारी रोजी होईल.

 

यापूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी आयपीएल 2022 चे (IPL 2022) आयोजन भारतात (India) घेण्याचा मानस बोलून दाखवला होता. 15 वे सत्र मार्च अखेर सुरु होईल आणि मेच्या अखेरच्या आठवड्यात लीगची सांगता होईल, असे जय शाह यांनी सांगितले होते.

 

आयपीएल 2021 चे आयोजन अहमदाबाद (Ahmedabad), बंगळुरु (Bangalore), दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) आणि कोलकाता (Kolkata) या सहा शहरात झाले होते. 2021 च्या स्पर्धेत खेळाडू कोरोनाबाधित होताच अर्ध्यात स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यानंतर दुसरा टप्पा मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईत (UAE) खेळविण्यात आला होता.

 

मुंबईच आयोजन का?

मुंबईत वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), सीसीआयचे ब्रेबॉर्न स्टेडियम (Brabourne Stadium) आणि
नवी मुंबईत डी. वाय पाटील स्टेडियम (DY Patil Stadium) आहे.
अधिक गरज भासली तर अडीच तासांच्या अंतरावर असलेल्या पुण्यातील गहुंजे स्टेडियम (Gahunje Stadium Pune) आहेच.
अशावेळी खेळाडूंना विमान प्रवास करावा लागणार नाही. यामुळे कोरोनाची भीती राहणार नाही.
मुंबईत सर्व दहा संघाचे खेळाडू वास्तव्य करु शकतील एवढी पंचतारांकित हॉटेल (Five Star Hotel) आहेत.
या हॉटेल्समध्ये सहजपणे बायोबबल (Bio Bubble) स्थापन करता येऊ शकते, त्यामुळे यंदाचे आयपीएलचे सर्व सामने मुंबईत घेण्याचा निर्णय झाला आहे.

 

Web Title :- IPL 2022 | the ipl will be held in mumbai this year and the official announcement will be soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा