IPL 2022 | आयपीएलच्या पुढील पर्वासाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा महालिलाव; दोन नवे संघही येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – IPL 2022 | कोरोनाचा फटका आयपीएल (IPL) लाही बसला आहे. आता पुढील पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली असून बीसीसीआय (BCCI) यासंदर्भात लवकरच घोषणा करणार आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून नव्या संघांसाठी मूळ किंमत दोन हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यानंतर खेळाडूंचा महालिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. दरम्यान या पूर्वीही मे महिन्यात नवे संघ निवडीची प्रक्रिया सुरु होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा लिलाव स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा हि प्रक्रिया सुरु झाली असून नव्या संघांच्या शर्यतीत अहमदाबाद, पुणे, लखनऊ आणि इंदूर सर्वांत आघाडीवर आहेत. IPL 2022 | there will be two new teams ipl mahalilav december 2022

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

गतवर्षापर्यँत प्रत्येक संघाची मूळ किंमत एक हजार ५०० कोटी ठेवण्याचा विचार सुरू होता, मात्र राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या बदलानंतर बोर्ड फेरविचार करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार कोटी किंमत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चार खेळाडूंना रिटेन करण्याची योजना येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू रिटेन नियमात बदल करण्याचा विचार सुरु आहे. या नियमानुसार आधी पाच खेळाडूंना रिटेन करण्यास मुभा देण्यात आली होती. ती आता चारपर्यंत मर्यादित असेल. यात तीन भारतीय आणि एक विदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन विदेशी असा पर्याय दिला जाईल. जर तीन खेळाडू रिटेन केल्यास फ्रॅन्चायजीच्या रकमेतूनही कपात केली जाईल. ती साधारण १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींची असेल. तर दोन खेळाडू घेतल्यास १२.५ आणि ८.५ कोटी कापले जातील. एक खेळाडू रिटेन केल्यास १२.५ कोटी कपात केली जाईल.लिलावाच्या नियमांतही बदल केले जाणार असल्याचे बोलले जाते. त्यानुसार वेतनकॅप ८५ कोटींवरून ९० कोटींपर्यंत जाईल. दहा संघ असल्यास किमान ५० कोटी रुपये वेतन कॅपमध्ये जातील. यामध्ये फ्रॅन्चायजीला यापैकी ७५ टक्के रक्कम खर्च करावी लागेल आगामी ३ वर्षांत वेतन कॅप १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या संघाची किती कोटींमध्ये विक्री
संघ किंमत
मुंबई इंडियन्स ८३३
रॉयल चॅलेंजर्स ८३१
डेक्कन चार्जर्स ७९७
चेन्नई सुपरकिंग्स ६७७
दिल्ली डेअरडेव्हिल्स ६२५
किंग्स इलेव्हन पंजाब ५६६
केकेआर ५५९
राजस्थान रॉयल्स ५००

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : ipl 2022 there will be two new teams ipl mahalilav december 2022

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

sakshana salgar | राष्ट्रवादी युवती सेल आक्रमक, म्हणाल्या – ‘…तर पडळकरांच्या बगलबच्चांना घरात घुसून मारू’

Baramati Police News | बारामती पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी

Baramati Crime News । ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर गोळीबार, माळेगावच्या माजी सरपंचाला अटक