IPL 2023 | CSK च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूचे टीममध्ये झाले पुनरागमन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) हंगामाला 31 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्ज या संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे चेन्नईचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून दीपक चहर फिटनेस समस्येशी लढताना दिसला होता. आता तो आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी पूर्णपणे फिट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

दीपक चहर पूर्वी स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंज देत होता, त्यानंतर त्याला क्वाड ग्रेड 3 टियरचा सामना करावा लागला. दीपक शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्या सिरींजमधील दुसऱ्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो पुन्हा संघाबाहेर गेला. 2022 मध्ये दीपक चहर भारतीय संघाकडून फक्त 15 सामने खेळू शकला. त्याच्या या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला टी-20 विश्वचषक खेळता आला नव्हता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबमध्ये बराच काळ घालवल्यानंतर, चहर आयपीएलच्या आगामी हंगामात भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या २ महिन्यांपासून फिटनेसवर खूप काम केले
दीपक चहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले कि, “गेल्या 2 ते 3 महिन्यांत मी माझ्या फिटनेसवर खूप काम केले आहे.
आता मी आयपीएलमध्ये (IPL 2023) खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
मला २ मोठ्या दुखापती झाल्या ज्यात एक स्ट्रेस फ्रॅक्चर आणि दुसरी क्वाड ग्रेड 3 टियर होती असे तो म्हणाला.
तसेच “कोणत्याही खेळाडूला या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागतो, विशेषत: वेगवान गोलंदाजाला.
जर मी फलंदाज असतो, तर मी खूप आधी खेळायला सुरुवात केली असती,
पण वेगवान गोलंदाजासाठी स्ट्रेस फ्रॅक्चरनंतर परत येणं आणि ट्रॅकवर येणं सोपं काम नाही.

 

दीपक चहर हा पॉवर प्लेमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने समोरच्या संघाला अडचणीत आणण्याचे काम करतो.
त्याच्या पुनरागमनामुळे चेन्नईच्या संघाची ताकद वाढली तर बाकी संघाची डोकेदुखी वाढली आहे.
बऱ्याच कालावधीनंतर दीपक चहर हा संघात परतला असून तो त्याचा जलवा दाखवण्यात कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- IPL 2023 | ahead of ipl 2023 csk player deepak chahar recovered from injury and the team got relief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या