IPL 2023 Auction | ठरलं तर ‘या’ दिवशी पार पडणार IPLचा लिलाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी एक मिनी लिलाव (IPL 2023 Auction) पार पडणार आहे. हा लिलाव 16 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये (Bangalore) होणार आहे. यावर्षी आयपीएलचे (IPL 2023 Auction) सगळे सामने जुन्या फॉर्मॅटनुसार होणार आहे. म्हणजेच सर्व संघ एक मॅच होम आणि एक विरोधी संघाच्या मैदानावर खेळणार आहे. कोरोनामुळे (Corona) 2019 पासून या फॉरमॅटमध्ये स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती.

 

आयपीएलच्या पुढील 16 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. 2019 पासून पुढील दोन हंगाम भारताबाहेर आयोजित करण्यात आले होते. 2021 चा हंगाम भारतात सुरू झाला होता, परंतु कोरोना संसर्गाची प्रकरणे मध्यभागी आल्यानंतर पुढील अर्धी स्पर्धा यूएईमध्ये (UAE) पार पडली. या सीझनमधील लीग टप्प्यातील सामने फक्त तीन शहरांमध्ये खेळण्यात आले होते. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियम वर (Eden Gardens Stadium) प्ले ऑफच्या सामन्याचे नियोजन करण्यात आले होते.

 

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात संघांना 90 कोटी रुपये रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या लिलावासाठी ते 95 कोटी रुपये दिली जाऊ शकते. गेल्या वर्षी एक मेगा लिलाव झाला होता, परंतु यंदाच्या हंगामासाठी मिनी लिलाव होणार आहे.

 

Web Title :-  IPL 2023 Auction | ipl 2023 auction set to take place on december 16 in bengaluru