×
Homeक्रीडाIPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी खेळाडूंना दिली 'हि' डेडलाईन

IPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी खेळाडूंना दिली ‘हि’ डेडलाईन

पोलीसनामा ऑनलाईन   : IPL 2023 चं मिनी ऑक्शन 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या ऑक्शन अगोदर बीसीसीआयने खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनसाठी शेवटचा दिवस निश्चित केला आहे. या लिलावात आपले नाव नोंदवण्यासाठी खेळाडूंना 15 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची डेडलाईन दिली आहे. (IPL 2023)

ऑक्शनची तारीख बदलणार?

आयपीएलच्या मिनी ऑक्शनसाठी निश्चित केलेल्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर आयपीएल फ्रँचायझींनी बीसीसीआयकडे तारीख बदलण्याची मागणी केली आहे. बीसीसीआयकडून यावर विचार सुरु असून त्यावर अजून कोणता निर्णय घेण्यात आला नाही. 23 डिसेंबर हा ख्रिसमसच्या आसपासचा दिवस असल्यानं फ्रँचायझींना त्यांचे बरेच परदेशी कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत. अनेक फ्रँचायझींकडे परदेशी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. आयपीएलच्या दहापैकी सात संघांचे मुख्य प्रशिक्षकही परदेशी असल्यामुळे फ्रँचायझींनी हि मागणी केली आहे. या विषयावर पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आत्ताचा मिनी लिलाव एक दिवसाचा असणार आहे. (IPL 2023)

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

163 खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझींनी कायम ठेवले आहे तर 85 खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे.
या लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक रक्कम आहे. हैदराबादकडे 42.25 कोटी, पंजाब किंग्जकडे
32.20 कोटी, लखनऊ सुपरजायंट्सकडे 23.35 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 20.55 कोटी रुपये आणि
चेन्नई सुपर किंग्जकडे 20.45 कोटी रुपये शिल्लक आहेत. या रकमेनुसार हैदराबाद जास्त बोली लावून
महत्वाचे खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न करेल. नुकत्याच पार पडलेल्या T-20 वर्ल्डकपमध्ये अनेक
खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे या मिनी लिलावात त्यांच्यावर अधिक
बोली लागण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सॅम करन, बेन स्टोक्स आणि कॅमेरून ग्रीन या खेळाडूंवर अधिक
बोली लागू शकते.

Web Title :- IPL 2023 | bcci fixed last date for registration of players for ipl auction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhvi Kapoor | जान्हवीने धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहर बद्दल केले ‘हे’ मोठे विधान

Pune Crime | …म्हणून नात जावयाने केला 74 वर्षाच्या सासूच्या खूनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

Must Read
Related News