IPL 2023 | गुजरातला मोठा धक्का! केन विल्यमसन आयपीएलमधून बाहेर; उपचारासाठी न्यूझीलंडला रवाना

पोलीसनामा ऑनलाईन : IPL 2023 | हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने काल चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून यंदाच्या मोसमाची धमाक्यात सुरुवात केली आहे. मात्र आता गुजरात टायटन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. यंदाच्या लिलावात गुजरात फ्रँचायझीने 2 कोटी रुपयांची बोली लावून विल्यमसनला खरेदी केले होते. (IPL 2023)

केन विल्यमसनला दुखापत कशी झाली?
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) मारलेला बॉल अडवताना त्याला हि दुखापत झाली आहे. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर षटकार वाचवला पण त्याला चौकार रोखता आला नाही. मात्र यावेळी त्याला दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. केन विल्यमसनची दुखापत किती गंभीर आहे हे तपास अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. (IPL 2023)

केन विल्यमसनची आयपीएल कारकीर्द
केन विल्यम्सनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 77 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 75 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 36.22 च्या सरासरीने आणि 126.03 च्या स्ट्राइक रेटने 2101 धावा केल्या आहेत. यामध्ये 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
यामध्ये 89 हि त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मागच्या वर्षी सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळताना
त्याने 13 सामन्यांत केवळ 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या. यामध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावले होते.
यंदाच्या सीझनमध्ये गुजरातच्या संघाने 2023 च्या मिनी लिलावात 2 कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतले होते.

केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
केन विल्यमसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 94 कसोटी, 161 एकदिवसीय आणि
87 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे, कसोटीत 8124 धावा, एकदिवसीय सामन्यात 6555 धावा
आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2464 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 41 शतके झळकावली आहेत.

Web Title :- IPL 2023 | big blow to gujarat titans kane williamson out of ipl 2023 injured in match against csk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

New Gold Hallmark | सोने खरेदी-विक्रीच्या नियमात आजपासून होणार बदल; नवीन हॉलमार्क होणार लागू

Buldhana Crime News | 26 वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; बुलढाणामधील घटना

Pune Crime News | कोंढवा : पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या पोटात खुपसला चाकू