IPL 2023 | पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माने केली भावुक पोस्ट, म्हणाला…..

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप 2022 (T-20 World Cup) नंतर आता क्रिकेट रसिकांना IPL 2023 वेध लागले आहे. या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) निवृत्ती (Retirement) जाहीर केली. पोलार्डने IPL 2023 रिटेन्शन डेडलाइनच्या (Retention deadlines) काही तास आधी आपली निवृत्ती जाहीर केली होती. पोलार्डच्या या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून पोलार्डबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

रोहितने काय लिहिले पोस्टमध्ये?
पोलार्ड हा मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच एक खरा दिग्गज राहिला आहे, पोलार्डने मोठा प्रभाव पाडला आहे, तो नेहमीच मुंबईसाठी मनापासून खेळला आहे. पोलार्ड आणि स्वतःचा फोटो शेअर करताना रोहितने या गोष्टी सांगितल्या. रोहितने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की, तो त्याला खूप मिस करेल. निवृत्तीच्या निर्णयानंतर पोलार्ड मुंबई संघाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडला जाणार आहे. (IPL 2023)

किरॉन पोलार्डची आयपीएल कारकीर्द
पोलार्ड 2010 पासून आयपीएल खेळत आहे. त्याने आतापर्यंत लीगमधील 189 सामन्यांमध्ये 28.67 च्या सरासरीने आणि 147.32 च्या स्ट्राइक रेटने 3412 धावा केल्या आहेत.
यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डने आपल्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे.
पोलार्डने आयपीएलमध्ये गोलंदाजीमध्ये योगदान देत आयपीएलमध्ये एकूण 69 विकेट घेतल्या आहेत.
44 धावांत 4 बळी ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

Web Title :- IPL 2023 | big man big impact and always played with heart rohit sharma on kieron pollard ipl retirement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?