IPL 2023 | ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून निवृत्ती; सीएसकेने त्याच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL 2023 साठी आतापासूनच संघबांधणीला सुरुवात झाली आहे. कोणत्या टीममध्ये कोणते खेळाडू खेळणार याची यादी बीसीसीआयकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर आयपीएलमधील संघांनी ज्या खेळाडूंना रिलीज केले आहे, त्या खेळाडूंसाठी एक मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. या लिलावात सुमारे 1 हजारहून अधिक खेळाडूंवर बोली लागणार आहे. (IPL 2023)

 

आयपीएलच्या आगामी सीझनसाठी अनेक संघाने मोठे निर्णय घेत काही खेळाडूंना रिलीज केले. असाच एक निर्णय सीएसकेने घेतला. त्यांनी ड्वेन ब्राव्होला यंदाच्या आयपीएलसाठी संघातून रिलीज केले. त्याला संघातून जरी रिलीज केले असले तरी त्याला नवी जबाबदारी देऊन टीम सोबत कायम ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होची संघाचा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. (IPL 2023)

 

चेन्नई सुपर किंग्जने लक्ष्मीपती बालाजी पुढील हंगामात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक नसल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
त्यामुळे आगामी काळात ड्वेन ब्राव्हो सीएसकेचा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पडणार आहे.
ड्वेन ब्राव्हो हा केवळ चेन्नई सुपर किंग्जसाठीच नव्हे, तर आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमात सर्वाधिक
बळी घेणारा गोलंदाज आहे. 22 धावांत 4 विकेट्स हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्पेल आहे.

 

Web Title :- IPL 2023 | dwayne bravo has retired from ipl and will now be the bowling coach of csk in ipl 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत