IPL 2023 | सॅम करनवर विक्रमी बोली; आतापर्यंतचा ठरला सर्वात महागडा खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन : आयपीएल 2023 चा (IPL 2023) मिनी लिलाव आज कोची येथे पार पडत आहे. यामध्ये 87 स्लॉटसाठी 405 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनला आयपीएल 2023 (IPL 2023) च्या मिनी लिलावात पंजाब किंग्जने विक्रमी बोली लावत संघात घेतलं. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 18.50 कोटी रुपये मोजून पंजाबने त्याला विकत घेतलं आहे. सॅम करन दुखापतीमुळे गेल्या हंगामात खेळू शकला नव्हता. सॅम करनला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मोठी चढाओढ सुरू होती. अखेर पंजाबने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

सॅम करनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले असून 23 डावात 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने 31 डावात 31.09 च्या सरासरीने 32 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 20 वर्षे वय असताना सर्वात कमी वयात हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (IPL 2023)

यंदाच्या आयपीएलमध्ये सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन आणि हॅरी ब्रूक हे 5 खेळाडू कोट्याधीश झाले आहेत.
यामध्ये सॅम करनला 18.50 कोटी रुपये मोजून पंजाबने, हॅरी ब्रुक 13.25 कोटी रुपयांमध्ये सनरायजर्स हैदराबादने, कॅमरून ग्रीनला मुंबईने 17.50 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. तसेच वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू निकोलस पूरनला 16 कोटी रुपयांमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतलं.आहे. तर बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपये देऊन चेन्नईने आपल्या ताफ्यात सामावून घेतले आहे.

Web Title :- IPL 2023 | ipl auction 2023 sam curran became most expensive player in ipl history

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मौन सोडले, म्हणाले ‘8 जूनच्या रात्री…’

Mukta Tilak Funeral | आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीमध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; 16 भारतीय जवानांचा मृत्यू