IPL 2023 | आज रंगणार आयपीएलचे डबल हेडर सामने; ‘हे’ 4 संघ भिडणार आमने-सामने

पोलीसनामा ऑनलाईन : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील डबल हेडर सामने पार पडणार आहेत. यामध्ये पहिला डबल हेडर सामना पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात तर दुसरा सामना दिल्ली (Delhi Capitals) आणि लखनौ (Lucknow Super Giants) यांच्यात पार पडणार आहे. हि क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल.

पंजाब आणि कोलकाता यांच्यात लढत
हा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर म्हणजेच पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (Punjab Cricket Association Stadium) मोहाली येथे खेळवला जाणार आहे. हा सामना आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. त्याच्या अगोदर 3 वाजता नाणेफेक होणार आहे. यंदाच्या मोसमात शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाबचे नेतृत्व करणार आहे तर नितीश राणा (Nitish Rana) कोलकाताच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त असल्याने तो यंदाच्या आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी नितीश राणा कोलकाताच्या संघाची कमान सांभाळणार आहे. (IPL 2023)

लखनौ आणि दिल्ली यांच्यात लढत
आयपीएलमधील दुसरा डबल हेडर सामना लखनौ आणि दिल्ली यांच्यात पार पडणार आहे. हा सामना लखनौमधील इकाना स्टेडिअमवर (Ikana Stadium) खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याअगोदर 7 वाजता नाणेफेक होणार आहे. केएल राहुल (KL Rahul) लखनौ संघाची धुरा सांभाळणार आहे तर रिषभ पंत (Rishabh Pant) अपघातग्रस्त असल्यामुळे अनुभवी डेव्हिड वॉर्नर (David Warner) दिल्लीच्या संघाची धुरा सांभाळणार आहे.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Star Sports Network) विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘Jio Cinema’ अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे.

Web Title :-  IPL 2023 | ipl first double header match punjab kings vs kolkata knight riders and lucknow super giants vs delhi capitals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MS Dhoni | धोनीचा अजून एक विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला CSK चा पहिला फलंदाज

Maharashtra Govt News | सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद

Ready Reckoner Rate Maharashtra | रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Ratnagiri News | सभेवरून परतल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्येने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sudhir Mungantiwar | सर्वांगीण ग्रामसमृद्धीसाठी ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’ राबविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार