IPL 2023 | लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! ‘हा’ मॅच विनर खेळाडू आयपीएलमधून होणार बाहेर?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या पर्वाला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील (IPL 2023) प्रत्येक संघ आपल्या संघबांधणीला सुरुवात करत आहेत. या सिझनपूर्वी काही संघाना खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. या संघांमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघांचा समावेश आहे. आता यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) संघाचा समावेश झाला आहे.

स्टार गोलंदाज मोहसिन खान आयपीएलला मुकणार?

मोहसिन खान (Mohsin Khan) सध्या दुखापतग्रस्त आहे. तो सध्या एलएसजीमध्ये प्रशिक्षण घेत आहे, परंतु त्याच्या फिटनेसबाबत अजून साशंकता आहे. मोहसिन खानने मागच्या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणात केलेल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले होते. मोहसिन खान हा डावखुरा गोलंदाज आहे.

मोहसिन खानची मागच्या मोसमातील कामगिरी

मोहसीन खान या डावखुऱ्या गोलंदाजाने मागच्या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्याने संपूर्ण सीझनमध्ये एलएसजीकडून खेळताना 9 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या.या कामगिरीमुळे तो संघाचा दुसरा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आयपीएल 2022 नंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो मागच्या वर्षी एकही सामना खेळला नाही.

आयपीएलपूर्वी हे भारतीय खेळाडू झाले जखमी

आयपीएल 2023 (IPL 2023) सुरु होण्यापूर्वी अनेक भारतीय स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडले आहेत. यामध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna), मोहसिन खान (Mohsin Khan) यांचा समावेश आहे.

लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2023 स्क्वॉड

आवेश खान, आयुष बडोनी, दीपक हुडा, के. गौतम, करण शर्मा, केएल राहुल, कृणाल पंड्या, काइल मेयर, मनन वोहरा, मार्कस स्टोइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, क्विंटन डी कॉक,
रवी बिश्नोई, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, डॅनियल सॅम्स,
अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर चरक.

Web Title :-  IPL 2023 | lucknow super giants bowler mohsin khan has
suffered an injury and is doubtful for ipl 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune-Satara National Highway | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून
घ्या, अन्यथा…

Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली
श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी

7th Pay Commission |  केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांना खुषखबर, मोदी सरकारने वाढवला 4 टक्के DA