IPL Auction 2020 : 3 तासांत 33 क्रिकेटवीर ‘मालामाल’, 1 अब्जाहून अधिक ‘उलाढाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमासाठीचे ऑक्शन कोलकत्ता येथे आज झाले. 73 जागांसाठी 338 खेळाजू रांगेत आहेत. यात 190 भारतीय खेळाडू, 145 परदेशी खेळाडू आणि 3 संलग्न देशातील खेळाडूंचा समावेश आहे. आज मुंबई इंडियन्सने ख्रिस लीनला पहिल्याच प्रयत्नात 2 कोटीच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात जमा केलं.

तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरोन फिंचवर आयपीएलच्या या मोसमात मोठी बोली लागली आहे. त्याला कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात सहभागी करुन घेण्यात आले. तर किंग्स इलेव्हन पंजाबने ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटीला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं. पॅट कमिन्सनं याही पुढे जाऊन रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली. दुपारी सुरु झालेल्या या पहिल्या सत्रात म्हणजे फक्त साडेतीन तासात तब्बल 1 अब्ज रक्कमेची उलाढाल झाली आहे.

पहिल्या सत्रात पॅट कमिन्सला सर्वात जास्त 15.50 कोटी रक्कम मिळाली. तर ग्लेन मॅक्सवेल (10.75 कोटी), ख्रिस मॉरिस (10 कोटी), शेल्डन कोट्रेल (8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील (8 कोटी) यांचा क्रमांक लागतो.

साडे तीन तासात सायंकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 33 खेळाडूंवर बोली लागली होती. तर 17 खेळाडून अनसोल्ड राहिले, म्हणजे त्यांचावर बोलू लागली नाही. एकूण 33 खेळाडूंसाठी 8 संघांनी मिळून 1 अब्ज 17 कोटी 55 लाख रुपयांची रक्कम मोजली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/