IPL Auction 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ‘हा’ स्फोटक फलंदाज, ‘T-10’ लीगमध्ये ठरला ‘सर्वोत्तम’ खेळाडू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल 2020)च्या पुढील वर्षासाठी कोलकात्यात आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या यादीत 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशातील खेळाडूंचा समावेश आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणात आहे. यात नवीन 24 खेळाडू असणार आहे. यात बांग्लादेशचा कॅप्टन मुश्फीकर रहिम, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा तसेच वेस्ट इंडिजचा केस्रीक विलियम्स यांचा समावेश आहे. 21 वर्षीय फलंदाज विल जॅक्सची एन्ट्री मात्र लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सकडून रिलीज करण्यात आलेल्या ख्रिस लीनचं नाव पहिलंच आलं. त्याच्यासाठी बोली लावणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ होता. या खेळाडूसाठी चुरस पहायला मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. आपल्या ताफ्यात ख्रिस लीनला घेण्यासाठी मुंबई इंडियन्सला 2 कोटींची किंमत मोजावी लागली.

ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनला कोलकाता नाईट रायडर्सनं रिलीज केलं होतं. परंतु त्याला डच्चू दिल्याचा कोलकाता नाईट रायडर्सला पश्चाताप होत आहे. कारण टी 10 लीगमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली आहे. ख्रिसनं या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. केकेआरनं रिलीज केल्यानंतर ख्रिसची बॅट चांगलीच तळपताना दिसली. टी 10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स सघांचं नेतृत्व करणऱ्या ख्रिस लीन यानं 8 डावात 236.30 च्या स्ट्राईक रेटनं 371 धावा केल्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/