IPL Auction 2020 : पॅट ‘कमिन्स’ ठरला सर्वात ‘महागडा’ खेळाडू, ‘KKR’ ने मोजली इतकी ‘रक्कम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमासाठीचे ऑक्शन कोलकत्ता येथे आज सुरु आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रांगेत आहेत. यात 190 भारतीय खेळाडू, 145 परदेशी खेळाडू आणि 3 संलग्न देशातील खेळाडूंचा समावेश आहे. आज मुंबई इंडियन्सने ख्रिस लीनला पहिल्याच प्रयत्नात 2 कोटीच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात जमा केलं. तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरोन फिंचवर आयपीएलच्या या मोसमात मोठी बोली लागली आहे. त्याला कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात सहभागी करुन घेण्यात आले. तर किंग्स इलेव्हन पंजाबने ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटीला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं. पॅट कमिन्सनं याही पुढे जाऊन रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली.

कोलकत्ता नाइट रायडर्सने रिलीज केलेल्या ख्रिस लीनवर मोठी बोली लागणार, अशी शक्यता होती. परंतु कोणतीही चुरस न दिसता त्याला मुंबई इंडियनने 2 कोटीला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं. 1 कोटी मूळ किंंमत असलेल्या फिंचला RCB ने 4.40 कोटी रुपयांत आपल्या तंबूत घेतलं. आयपीएलमधील त्याचा हा आठवा संघ आहे. याआधी तो राजस्थान रॉयल्स (2010), दिल्ली डेअरडेव्हिल्स (2011-12), पुणे वॉरिअर्स इंडिया (2013), सनरायझर्स हैदराबाद (2014), मुंबई इंडियन्स (2015), गुजरात लायन्स (2016-17), किंग्स इलेव्हन पंजाब (2018) या संघात होता.

तर किंग्स इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेलसाठी 10.75 कोटी मोजले, त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. कोलकत्ता नाइट रायडर्सने कमिन्सची 15.50 कोटी रुपयात खरेदी केली. ही आयपीएलमधील दुसरी मोठी बोली होती. तर युवराज सिंग 16 कोटीसह (दिल्ली कॅपिटल्स 2015) अव्वल स्थानी आहे. या यादीत बेन स्टोक्स (14.50 कोटी), युवराज सिंह (14 कोटी), दिनेश कार्तिक (12.50 कोटी), टायमल मिल्स (12 कोटी) अशा क्रमांकावर आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/