‘RCB’नं संघातून बाहेर काढल्यानंतर कोहलीनं त्याला मारली ‘विराट’ मिठी, आता ‘या’ खेळाडूवर आयपीएलमध्ये लागणार मोठी ‘बोली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2020 ची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता आयपीएल 2020 चं ऑक्शन आज कोलकत्तामध्ये होणार आहे. या दरम्यान सगळ्यांच्या नजरा चेन्नई वनडेमध्ये टीम इंडियाच्या विरोधात शानदार खेळी करणाऱ्या शिमरॉन हेटमायरवर आहेत. असा अंदाज आहे की त्यांच्यावर कोट्यावधीची बोली लागू शकते.

आज ऑक्शनच्या दरम्यान शिमरॉन हेटमायरचे नाव जसे की, हॉलमध्ये पुकारले जाईल अनेक टीम त्याला खरेदी करण्यासाठी पुढे येतील. रॉयल चॅलेंजर्स बंगलूरने त्याला रिलीज केले होते.

बंगलोरने मागील सीजनमध्ये हेटमायरला 4.2 कोटी रुपयात खरेदी केले होते. आता ऑक्शनच्या आधीच शिमरॉन हेटमायरने टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. चेन्नईमध्ये त्यांने 7 षटकार आणि 11 चौकार मारले. त्याबरोबर त्याने आपले शतक देखील साजरे केले.

चेन्नईमध्ये हेटमायरने शानदार खेळी करत शतक केले तेव्हा सामना संपल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला अभिनंदन देखील केले. या घटनेकडे असे पाहिले जात आहे की फलंदाजाला पुन्हा रॉयल चॅलेंजर्समध्ये सहभागी करु इच्छित आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/