‘ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड के देता है’ ! एकेकाळी पाणीपुरी विकणार्‍या ‘या’ खेळाडूवर लागली 2.40 कोटींची बोली

पोलीसनामा ऑनलाइन टीम : काही दिवसांतच आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी सध्या लिलाव सुरु असून यावेळी परदेशी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनीही बाजी मारली. यावेळी अनेक मोठ्या खेळाडूंसाठी करोडोंची बोली लावली. मात्र सर्वात जास्त बोली लागली ती मुंबईकर यशस्वी जयस्वालवर. या खेळाडूला राजस्थान रॉयल्स संघानं २.४० कोटींना विकत घेतले. तसेच भारताचा अंडर १९ कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं १.९० कोटींना विकत घेतले आहे.

एकेकाळी मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वीनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर यशस्वीला जानेवारीमध्ये होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कप संघातही स्थान मिळाले. यशस्वीनं आपल्या वेगळ्या फलंदाजी शैलीनं सगळ्यांचे मन जिंकले आहे. एके दिवशी आझाद मैदानात क्रिकेट खेळत असताना त्यानं हातात घेतलेली बॅट पुन्हा खाली ठेवली नाही. विशेष म्हणजे यशस्वीच्या यशामागे अर्जुन तेंडुलकरचा मोठा हात आहे. आयपीएलच्या लिलावात २० लाख बेस प्राईज असलेल्या यशस्वी एका दिवसात करोडपती झाला, मात्र मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुंबईकडे सर्वात कमी रक्कम असल्यामुळं यशस्वीवर त्यांनी बोली लावली नाही.

अर्जुननं केले जयस्वालला ‘यशस्वी’
अर्जुन आणि यशस्वी खुप चांगले मित्र आहेत. या दोघांची मैत्री बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झाली होती. या अकादमीत ट्रेनिंग घेत असताना दोघेही एकाच खोलीत राहायते. यशस्वी सचिनचा खुप मोठा फॅन असल्याचे अर्जुननं यशस्वी आणि सचिन यांची भेट घडवून आणली. मास्टर ब्लास्टरही यशस्वीच्या खेळीचा फॅन झाला. त्यामुळं खुश होऊन सचिननं यशस्वीला एक बॅट भेट दिली आणि त्यांनंतर यशस्वीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/