IPL 2021 : लिलावात उतरतील 292 खेळाडू, 2 कोटी बेस प्राईसचे आहेत ‘हे’ प्लेयर

नवी दिल्ली : सीनियर स्पिनर हरभजन सिंह आणि फलंदाज केदार जाधवच्या शिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलला 18 फेब्रुवारीला चेन्नईत होणार्‍या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील लिलावासाठी दोन कोटी रुपये बेस प्राईसच्या वर्गात ठेवण्यात आले आहे.

आयपीएल संचालन परिषदेने खेळाडूंच्या संख्येत कपात केली आहे, ज्यानंतर 292 खेळाडू लिलावासाठी उतरतील. आठ फ्रेंचायजी 61 जागा भरण्यासाठी बोली लावतील. लिलावाच्या यादीत 164 भारतीय, 125 परदेशी आणि असोसिएट देशांच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) कडे सर्वात जास्त 13 जागा उपलब्ध आहेत, तर सनरायजर्स हैद्राबाद केवळ तीन खेळाडूंना खरेदी करू शकते. किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम सर्वात जास्त 53 कोटी 10 लाख रुपयांची रक्कमेसह लिलावात उतरेल, तर हैद्राबादनंतर 11 कोटी (10 कोटी 75 लाख) पेक्षा काही कमी रक्कम आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) जवळ 22 कोटी 70 लाख रुपये आहेत आणि त्यांच्याकडे सात जागा उपलब्ध आहेत. सुपर किंग्जने यावर्षी हरभजन आणि जाधवला रिलीज केले आहे.

भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला सुधारित यादीत 20 लाख रुपयांच्या सर्वात कमी बेस प्राईसच्या वर्गात स्थान मिळाले आहे.

मॅक्सवेल आणि स्मिथशिवाय परदेशी खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुडला सर्वाधिक बेस प्राईसच्या वर्गात सहभागी करण्यात आले आहे.

दिड कोटी रूपयांच्या बेस प्राईसच्या वर्गात 12 खेळाडूंना जागा मिळाली आहे, तर भारतीय फलंदाज हनुमा विहारी आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव एक कोटी रुपयांच्या तिसर्‍या वर्गात आहेत. चेन्नईत लिलाव भारतीय वेळेनुसार, दुपारी तीन वाजता सुरू होईल.