IPL Auction 2021 : आतापर्यंतच्या IPL मध्ये कोणत्या खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली ?, जाणून घ्या

चेन्नई :  वृत्तसंस्था –   आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या लिलावात एका खेळाडूवर सर्वात जास्त बोली लागल्याचं पहायला मिळालं. ग्लेन मॅक्सवेलपेक्षाही या खेळाडूवर लिलावात मोठी बोली लागल्याचं दिसून आलं. या लिलावात मॅक्सेवलला 14 कोटी 25 लाख मोजत आरसीबीच्या संघानं आपल्या ताफ्यात सामिल करून घेतलं. परंतु यावेळी मॅक्सवेलपेक्षाही सर्वात जास्त बोली लागली ख्रिस मॉरिस याच्यावर. राजस्थान रॉयल्सच्या संघानं मॉरिसला संघात दाखल करून घेण्यासाठी 16.25 कोटी मोजले.

चेन्नई सुपरकिंग्स आणि आरसीबी यांच्यात मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा लगाली होती. अखेर आरसीबीनं 14 कोटी 25 लाख मोजत मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान दिलं.

मॅक्सवेलला गेल्या वर्षी मात्र चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी 20 मालिकेत मॅक्सवेलनं धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यावेळी मॅक्सवेलवर सर्वात जास्त बोली लागल्याचं पाहायला मिळालं होतं. स्मिथची बेस प्राईज होती ती 2 कोटी. दिल्लीच्या संघानं 2 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत स्मिथला संघात घेतलं. आयीपीएल लिलाव सुरू झाला तो करूण नायरपासून. परंतु यावेळी करुणला कोणीही संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यानंतर बोली लागलेला स्मिथ हा पहिलाच खेळाडू ठरला. परंतु स्मिथला यावेळी चांगला भाव मिळाल्याचं दिसून आलं.

अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनं दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली होती. परंतु तरीही त्याला तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडनं त्याला संघात स्थान दिलं नाही. यापूर्वी मोईन आरसीबीच्या संघाकडे होता. परंतु त्यांनी त्याला लिलावापूर्वी रिलीज केलं होतं. आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघानं सात कोटी रुपये मोजत या खेळाडूला संघात स्थान दिलं आहे.