क्रिस मॉरिसनं IPL Auction मध्ये रचला इतिहास, युवराजचं रेकॉर्ड तोडून बनला सर्वात महाग खेळाडू

चेन्नई : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिसनं भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजला दिल्ली संघाने 6 वर्षापूर्वी 16 कोटी रुपयांत खरेदी केलं होते. 2021 च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलं. 75 लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाल्याचे पहायला मिळाले.

मॉरीसला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स यांच्यात जोरदार चुरस रंगली होती. रॉयल चॅलेंजरर्सने आपल्या जुन्या खेळाडूला पुन्हा संघात घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. तर मुंबईला ट्रेंट बोल्टचा साथीदार म्हणून मॉरीस हवा होता. या दोन्ही संघांनी माघार घेतल्यानंतर पंजाब आणि राजस्थान संघामध्ये जोरदार रस्सिखेच झाली. यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत मॉरीसला आपल्या संघात घेतले.

मॉरिस हा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा रेकॉर्ड मोडला आहे. मागील वर्षी झालेल्या लिलावात कमिन्सनं बेन स्टोक्सला मागं टाकलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सला 15.5 कोटींना खरेदी केलं होतं. kkr नं कमिन्सला यावर्षी देखील रिटेन केले आहे.

IPL मधील यापूर्वीचे सर्वात महागडे खेळाडू
1. युवराज सिंह 2. पॅट कमिन्स 3. बेन स्टोक्ला 4. ग्लेन मॅक्सवेल