IPL Auction मध्ये वायरल झाला किंग खानच्या मुलाचा लुक, फॅन्सला दिसली शाहरुखची प्रतिमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गुरुवारी झालेल्या आयपीएल 2021 च्या ऑक्शनमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी झाला होता. वडीलांच्या गैरहजेरीत आर्यनच लिलावादरम्यान जूही चावलाच्या मुलीसोबत बसलेला दिसला. अशी तर ही बातमी जास्त मोठी नाही, परंतु सोशल मीडियावर वायरल फोटोजने फॅन्सला शाहरुखच्या मुलाकडे आकर्षित केले.

का ट्रेंड झाला शाहरुख खानचा मुलगा?

आयपीएल ऑक्शनमधून जी छायाचित्रे आणि व्हिडिओज समोर आले आहेत ते पाहून तमाम फॅन्स हैराण झाले. त्या फोटोजमध्ये आर्यन हुबेहुबे शाहरुखसारखाच दिसत आहे. काही काळासाठी तर सोशल मीडियावर यावरून सुद्धा चर्चा सुरू होती की, वायरल फोटोजमध्ये शाहरुखच बसला आहे की त्याचा मुलगा आर्यन. एका फॅनने आर्यनचा असा व्हिडिओ सुद्धा शेयर केला ज्यामध्ये तो आपल्या वडीलांप्रमाणे केसातून हात फिरवत आहे. या व्हिडिओत तर शाहरुख आणि आर्यनमध्ये तुलना करणे खुप अवघड होत आहे.

आर्यनचा लुक झाला वायरल

याच सारखेपणामुळे आर्यन खान सोशल मीडियावर ट्रेंड करून गेला. प्रत्येकजण त्यास बॉलीवुडचा अपकमिंग किंग म्हणत आहे. सर्वत्र केवळ त्याच्याच लुक्सची चर्चा आहे. आता तो चित्रपट जगतात पाऊल ठेवणार किंवा नाही हे काळच सांगेल. काही दिवसांपूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुखने हे म्हटले होते की, आर्यन अ‍ॅक्टिंगऐवजी डायरेक्शनमध्ये पाऊल ठेवू शकतो. तो आर्यनला चांगला रायटर मानतो आणि त्याच्यात चांगल्या डायरेक्टरचे गुण पहातो. आता आर्यन आपल्यासाठी कोणते फील्ड निवडतो, हे जाणून घेण्यासाठी फॅन्सला प्रतिक्षा करावी लागेल.