IPL FINAL 2023 | आयपीएलचा फायनल सामना बघायला येणार तीन देशाचे क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष भारतात!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IPL FINAL 2023 | भारताची जगप्रसिद्ध व बहुचर्चित क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल Indian Premier League (IPL) . राज्य विरूद्ध राज्य अशा रंगणाऱ्या या सामन्यांमध्ये भारताबरोबर अनेक परदेशी खेळाडू (Foreign Players) हिरहिरीने सहभाग नोंदवतात. आता या लीगचा फायनल जवळ य़ेऊ लागला आहे. येत्या २८ मे ला अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल (IPL FINAL 2023) लढत होणार असून, या सामन्यास अफगाणिस्तान (Afghanistan), श्रीलंका (Sri Lanka) व बांगलादेश( Bangladesh) या तीन देशांच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष हजेरी लावणार आहेत.

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या तिन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना भारतात आमंत्रित केले होते. या भेटीमध्ये आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा होणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी सांगितले.

 

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. यजमानपदासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असताना आशियाई क्रिकेट परिषद मात्र (ACC) नव्या यजमानाच्या शोधात आहे. ACC. चे अध्यक्ष जय शाह आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षी भारतीय संघ पाकिस्तानला (Pakistan) जाणार नसल्याचे सांगितले होते. तटस्थ देशात सामने होऊ शकतात, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष २८ मे रोजी अहमदाबादला येणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणाऱ्या टाटा आयपीएल 2023 (Tata IPL 2023) च्या
फायनलमध्ये हे सर्व सहभागी होणार आहेत. आशिया चषक 2023 बाबत भविष्यातील कृती
ठरवण्यासाठी यावेळी पुरक चर्चा होणार आहे. (IPL FINAL 2023)

 

 

 

Web Title :  IPL FINAL 2023 | the respective presidents of bangladesh afghanistan sri lanka
cricket boards will grace the tata ipl 2023 final

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा