IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आता ‘या’ नावाने ओळखला जाणार, लोगोही बदलला

पोलीसनामा ऑनलाईन – IPL च्या यंदाच्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नावात बदल केला असून लोगो देखील बदलला आहे. आता हा संघ पंजाब किंग्ज या नावाने ओळखला जाणार आहे. संघाच्या नावासोबत नवा लोगो देखील लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. पंजाबच्या संघाने आपल्या नावात बदल केल्याच्या निर्णयाची माहिती पीटीआयने दिली आहे.

याबाबत पंजाब किंग्ज संघाचे सीईओ सतिष मेनन म्हणाले की, पंजाब किंग्ज हा जबरदस्त ब्रँड म्हणून उदयास येईल आणि संघाच्या कोअर ब्रँडमध्ये बदल करण्याची व लक्ष केंद्रीत करण्याची ही योग्य वेळ आहे. संघाच्या नावात आणि लोगोत बदल केल्याने आमची फक्त ओळख बदलणार असे नाही. नवे नाव आणि ओळख ही संघाच्या एकीच सेलिब्रेशन करण्याची वेळ आहे. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत हे दाखवून देण्याची वेळ आहे. नव्या लोगोत एक जबरदस्त आक्रमकपणा आणि जीवंतपणा आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आता पंजाब किंग्ज नावाने ओळखला जाणार असला तरी 2008 सालापासून एकदाही स्पर्धेचे विजेतपद प्राप्त करता आले नाही. त्यामुळे नव्या नावासह आणि लोगोसह नव्या दमाने यंदाच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी पंजाब किंग्जने केली आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पंजाब किंग्ज संघाचे मोहीम बुरमन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पौल हे सहमालक आहेत.