क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! IPL 2020 ला मिळालं भारत सरकारकडून ‘ग्रीन’ सिग्नल, 10 नोव्हेंबरला होणार ‘फायनल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलची गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक संपली आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार आयपीएलला भारत सरकारने परवानगी दिली आहे. आयपीएलचं अंतिम वेळापत्रक तयार झालं आहे. आता हे टूर्नामेंट 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान UAE मध्ये खेळवलं जाणार आहे.

भारत सरकारकडून आयपीएल 2020 ला ग्रीन सिग्नल मिळाल्यानं क्रिकेटच्या लाखो चाहत्यांचा आनंद व्दिगणीत झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल स्पर्धेबाबत संभ्रामवस्था निर्माण झाली होती. मात्र, आता भारत सरकारनं परवानगी दिल्यानं चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.दरम्यान, BCCI नं महिलांचं IPL देखील खेळवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयपीएलचे सर्व प्रायोजक अबाधित राहणार आहेत. म्हणजेच आयपीएलचा मुख्य प्रायोजकाच्या रूपामध्ये चीनी स्पॉन्सर विवोच असणार आहे.