IPL वर सट्टा लावणारा अटकेत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यादरम्यान आयपीएल सामन्यावर सट्टा लावणार्‍या एकाला गुन्हे शाखेने मालाड परिसरातून अटक केली. संदीप मदनराज दोषी (41) असे या बुकीचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

संदीप चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालाड येथील मार्वे रस्त्यावरील गंगा सोसायटीतील सदनिकेवर छापा घालून त्याला अटक केली.

त्याच्याकडून एक मोबाइल फोन, बेटिंग आयडी आणि टीव्ही सेट पोलिसांनी जप्त केला आहे. संदीप हा ‘लोटस बुक 247’, ‘एबीईएक्ससीएच’, ‘प्लेविन 247’ या तीन अ‍ॅपच्या माध्यमातून सट्टा लावत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.