IPL Mini-Auction | IPLच्या लिलावात लागणार 1 हजारांपेक्षा जास्त खेळाडूंवर बोली; ‘या’ दोन देशांतील खेळाडू सर्वात जास्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL Mini-Auction | आयपीएल 2023 च्या हंगामासाठीची तयारी सुरू झाली आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबर 2022 मध्ये पार पडणार आहे. या लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच आयपीएलच्या लिलावासाठी खेळाडूंच्या लिलावाच्या नोंदणीची कालमर्यादाही संपली आहे. बीसीसीआयकडून याची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. यामध्ये सुमारे 1 हजाराहून अधिक खेळाडूंवर बोली लागणार आहे. (IPL Mini-Auction)

 

आयपीएलच्या या लिलावासाठी 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडूंसह एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा स्फोटक फलंदाज बेन स्टोक्स, कॅमरून ग्रीन, जो रूट, मयांक अग्रवाल अशा काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयकडून याची माहिती देण्यात आली आहे. हा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. (IPL Mini-Auction)

 

लिलावात या दोन देशांतील जास्त खेळाडूंचा समावेश
या मिनी लिलावात भारतातील एकूण 714 खेळाडू, 277 परदेशी खेळाडू आणि असोसिएट्स देशांमधील 20 खेळाडू यांनी आपली नोंदणी केली आहे.
या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक 57 खेळाडूंचा समावेश आहे,
तर दक्षिण आफ्रिकेच्या 52 खेळाडूंनी लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. याबरोबर यूएई,
नामिबिया, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या देशातील खेळाडूंनीदेखील आयपीएलसाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे.
दरम्यान, कोची येथे होणाऱ्या आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी ह्यूज एडमीड्स हेच लिलावकर्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

 

Web Title :- IPL Mini-Auction | more than 1000 players will be bid for in the ipl auction 109 of which are from these two countries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर