आगामी काळात ‘या’ ५ खेळाडूंना ‘MI’ दाखवू शकते बाहेरचा रस्ता

मुंबई : वृत्तसंस्था ऑनलाईन – आयपीएलचे हे पर्व मुंबई इंडियन्ससाठी खूपच चांगले गेले. या पर्वाच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला हरविले आणि चषकावर आपले नाव कोरले. चौथ्यांदा मुंबईने हे विजेतेपद पटकावले. या पर्वात अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली तर काहींनी निराश केले. या हंगामानंतर संघ आपले काही खेळाडू संघात कायम ठेवत असतात तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत असतात. एका अहवालानुसार या पर्वाचे विजेते २०२० या मोसमासाठी या पाच खेळाडूंना घरचा रस्ता दाखवू शकतात.

कोण आहेत ‘हे’ पाच खेळाडू,चला पाहुयात:

१) मिचेल मैक्लेन्घन
न्यूझीलंडचा हा जलदगती गोलंदाज या पर्वात पाच सामने खेळाला. या पाच सामन्यांत त्याने फक्त ३ बळी घेतले. तेदेखील त्याने पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना मिळवले होते. पुढील वर्षी त्याला बाहेरचा रस्ता दाखवून त्याच्या ऐवजी दुसरा गोलंदाज घेतला जाऊ शकतो.

२) बरिंदर सरन
या वर्षी त्याला फक्त दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्यातही तो अपयशी ठरला. त्याला एकही बळी मिळला नाही. मागील वर्षी सनरायजर्सकडे असणाऱ्या या खेळाडूला देखील मुंबई बाहेरचा रास्ता दाखवू शकते.

३) युवराज सिंह
१ करोड रुपयांमध्ये खरेदी केलेल्या युवराजला या पर्वात मुंबईने जास्त संधी दिली नाही. पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक केलं, मात्र त्यानंतरच्या चार सामन्यात त्याला विशेष काही करण्यात यश आले नाही. त्यामुळे त्याला देखील मुंबई इंडियन्स बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

४) ब्यूरन हेंड्रिक्स
दक्षिण आफ्रिकेचा मध्यमगती गोलंदाज हा अलजारी जोसेफचा बदली खेळाडू म्हणून आला होता. मात्र त्याला या पर्वात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याला देखील बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

५) रसिख सलाम डार
जम्मू काश्मीरच्या या गोलंदाजाला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. पहिल्या सामन्यांनंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मुंबईने दिली नाही. खराब प्रदर्शन आणि संघात असलेल्या अनुभवी खेळाडूंमुळे त्याला देखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.