नवी दिल्ली : वृत्त संस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ने युएईमध्ये होणार्या आपल्या 13व्या सीझनसाठी टूर्नामेंटचा नवा शीर्षक प्रायोजक ड्रीम इलेव्हनसोबत आपला नवा लोगो जारी केला आहे. आयपीएलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा लोगो जारी केला होता. यासोबतच मागच्या वर्षीची चॅम्पियन, मुंबई इंडियन्सने सुद्धा आयपीएलचा नवा लोगो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे.
ड्रीम 11 ने शिक्षण तंत्रज्ञानाशी संबंधीत कंपनी बायजू आणि अनअॅकडमीला मागे टाकत 222 कोटी रूपयात चार महिने 13 दिवसांसाठी प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत. ड्रीम इलेव्हन आयपीएल 2020मध्ये चीनी मोबाइल फोन कंपनी वीवोचे स्थान घेईल.
19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येईल आयपीएल
इंडियन प्रीमियर लीगचा 13वा सीझन 19 सप्टेंबरपासून 10 नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये खेळवला जाईल. कोरोना महामारीदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीम युएईला पोहचल्याही आहेत. तर अन्य टीम उड्डाण घेण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी या लीगचे आयोजन 29 मार्चपासून होणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते रद्द करावे लागले होते.