IPL Schedule 2023 | IPLचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी पार पडणार पाहिला आणि अंतिम सामना ?

पोलीसनामा ऑनलाईन : IPL Schedule 2023 | BCCI ने IPL 2023 चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले आहे. यंदा आयपीएल 2023 चा पहिला सामना 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. आयपीएल 2023 मध्ये (IPL Schedule 2023) एकूण 12 ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 52 दिवसांत 10 संघांमध्ये 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार आहेत. यामध्ये 18 डबल हेडर सामने असतील. 3 वर्षांनंतर ही स्पर्धा होम आणि अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या वर्षी लीगमध्ये 10 संघांपैकी प्रत्येक संघ घराबाहेर आणि घरामध्ये प्रत्येकी 7 सामने खेळतील.

 

आयपीएलच्या 10 संघांची दोन गटात विभागणी (IPL Schedule 2023)

ग्रुप A – मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
ग्रुप B – चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स

ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ 14-14 सामने खेळेल. या दरम्यान, प्रत्येक संघाला त्यांच्या घरी 7 सामने खेळावे लागतील, तर उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळावे लागतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ 7 होम आणि 7 अवे सामने खेळेल. अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाला या स्टेडियमवर आयपीएलचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.

Web Title :- IPL Schedule 2023 | ipl schedule 2023 first match to be held on march 31 dhoni to face hardik final to be played on may 28

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण

Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना