IPL चे एक ट्विट आणि बुचकळ्यात पडले सचिन तेंडुलकरचे चाहते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमधील खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाची नजर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर आहे. इंडियन प्रीमियर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘वीस लाखांत रॉयल चॅलेन्जर बंगळुरूला विकलेे गेले सचिन बेबी .’ त्यानंतर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना वाटले की सचिन बेबी म्हणजे सचिनचा मुलगा म्हणजेच अर्जुन तेंडुलकर आहे. परंतु सचिन बेबी सचिन तेंडुलकरचा मुलगा नसून केरळकडून खेळणार्‍या दुसर्‍या क्रिकेटपटूचे नाव आहे. या ट्विटनंतर क्रिकेटप्रेमींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सर्व प्रथम, काहीजण आयपीएलच्या ट्विटर हँडलला विचारताना दिसले की, सचिन बेबी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर तर नाही ना. काही वापरकर्ते या ट्विटच्या गोंधळाचे स्पष्टीकरण देतानाही दिसले. एका वापरकर्त्याने सांगितले, “नाही, केरळमध्ये घरगुती क्रिकेट खेळणारा सचिन बेबी आणखी एक भारतीय क्रिकेटपटू आहे.” तो डावखुरा फलंदाज आणि राईट आर्म ऑफ ब्रेकर आहे.

एका वापरकर्त्याने आयपीएल ट्विटर हँडलला मूर्ख म्हंटले, या वापरकर्त्याने लिहिले, “हद्द आहे .. # $ नुसत अर्जुन (सचिन बेबीऐवजी) देखील लिहू शकले असते … हँडल हाताळण्यासाठी इम्मेच्यूर माणसाला ठेवलय”

एका वापरकर्त्याने त्यावर एक मेम तयार केला, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, “रिलॅक्स , हे सचिन बेबी आहे, सचिनचे बेबी नाही.”