अब्दूर रेहमान यांची मानवी हक्क आयोगाच्या पोलीस महानिरीक्षकपदी बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या बिनतारी संदेश पोलीस उपमहानिरीक्षक अब्दूर रेहमान यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या पोलीस महानिरीक्षकपदी बढती करण्यात आली आली आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ८ उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. त्यात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक अब्दूर रेहमान गेले अनेक दिवस पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. त्यानंतर आता त्यांची पदोन्नती करत राज्य सरकारने त्यांच्याकडे राज्य मानवी हक्क आयोगाच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like