IPS Asim Arun Profile | 28 वर्षांच्या दमदार कारकिर्दीनंतर यूपीचे IPS असीम अरुण यांची राजकारणात एन्ट्री, जाणून घ्या कोणत्या सीटवरून लढवणार निवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UP – IPS Asim Arun Profile | कानपूरचे (Kanpur) पहिले पोलीस कमिश्नर आणि 1994 च्या बॅचचे IPS अधिकारी असीम अरुण (IPS Asim Arun Profile) यांनी व्हीआरएस घेऊन आपल्या करियरची दुसरी पायरी एक राजनेता म्हणून सुरु करणार आहेत. असीम अरुण भाजपच्या (BJP) तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक (UP Assembly Election) लढवणार आहेत. सूत्रानुसार असे समोर आले आहे कि, असीम अरुण हे त्यांच्या होम डिव्हिजनमधील कन्नौज सदरमधून निवडणूक रिंगणात उतरू शकतात. असीम अरुण यांची IPS अधिकारी म्हणून चांगली कारकीर्द आहे. 3 ऑक्टोबर 1970 रोजी बदायूं जिल्ह्यात जन्मलेले असीम अरुण यांचे वडील श्री राम अरुण हे देखील IPS अधिकारी होते. तसेच ते राज्याचे डीजीपी ही होते. व त्यांची आई शशी अरुण या सुप्रसिद्ध लेखिका आहेत.

असीम अरुण यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण लखनौ येथून केले, व दिल्लीतून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी सिविल सर्विससाठी तयारी केली आणि त्यामध्ये त्यांची निवड झाली. वडिलांप्रमाणेच त्यांनीही IPS होण्याचा निर्णय घेतला. आपल्या करियरमध्ये, असीम अरुण त्याच्या दमदार कार्यशैलीमुळे यूपी पोलिसांचा कणा बनले आहेत.

ISIS दहशतवाद्याला ठार केल्यानंतर खूप चर्चेत आले.

IPS झाल्यानंतर असीम अरुण हे यूपीच्या अनेक जिल्ह्यांचे पोलीस कॅप्टन आणि उपमहानिरीक्षक ही होते. यानंतर ते यूपी एटीएसचे प्रमुख झाले. अरुण (IPS Asim Arun Profile) तेव्हा खूप चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी लखनौ मध्ये लपून बसलेल्या ISIS दहशदवाल्याला मारले. असीम अरुणला माहिती मिळाली होती की, कानपूरच्या जाजमाउ केडीए कॉलनीमध्ये राहून ISIS चा दहशतवादी सैफुल्ला लखनौमध्ये लपून खूप मोठी घटना घडवून आणणार होता. ते अरुणला कळताच त्यांनी एटीएस कमांडो सह ठाकूरगंज परिसरात दहशतवाद्याला घेरले आणि ठार केले.

SPG आणि CBI पर्यंत दिल्या सेवा.

असीम अरुण यांची निडर प्रतिमा आणि दमदार कारकीर्दीमुळे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सिक्युरिटीमध्ये हि त्यांची निवड झाली होती. त्यामध्ये ते एसपीजीच्या क्लोज प्रोटेक्शन टीमचे प्रमुख होते. तसेच त्यांनी एसपीजी, एनएसजी आणि सीबीआयमध्येही काम केले आहे.

Web Title : IPS Asim Arun Profile | lucknow up assembly elections 2022 after 28 years of service ips asim arun enters politics to contest up vidhansabha chunav on bjp ticket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

Multibagger Stock | 3 महिन्यात 300% वाढला ‘या’ बासमती तांदळाच्या कंपनीचा स्टॉक, तुम्ही खरेदी केला आहे का?

PM Kisan | खुशखबर ! ज्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत आले नाहीत पैसे, ‘या’ तारखेला होतील जमा, जाणून घ्या तारीख

Girish Mahajan | पुणे पोलिसांनी जळगावमधून महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात, गिरीश महाजन अडचणीत येणार?

Link Aadhaar To Voter ID | केवळ एका SMS ने लिंक होईल वोटर आयडी कार्ड आणि आधार,
1950 वर कॉल करून सुद्धा मिळवू शकता ‘ही’ मोठी सुविधा