‘IPS ‘लेडी सिंघम’ आणि IAS ‘अवनीश’ यांच्यात ट्विटर ‘वॉर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वरिष्ठ आयएएस अधिकारी अवनीश शरण आणि आयपीएस अधिकारी डी. रूपा यांच्यात सध्या चांगलंच ‘ट्विटरवॉर’ सुरू असून सोशल मीडियावर त्यांच्या ट्विटर वॉरच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ‘लेडी सिंघम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी केलेल्या एका ट्विटनंतर ‘आपल्या साधेपणाबद्दल प्रसिद्ध असणारे’ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी प्रतिक्रिया दिली की, मॅडम तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. यानंतर त्यांना उत्तर देताना डी. रूपा म्हणाल्या की तुम्ही पुर्वग्रह मनात ठेवून बोलत आहात. या पार्श्वभूमीवर त्यांच्यात ट्विटरवॉर झाल्याचे दिसून आले.

या ट्विटरवॉरचे कारण म्हणजे आयपीएस अधिकारी असलेल्या डी. रूपा यांनी ट्विटरवर गीतेमधील एक श्लोक पोस्ट केला होता. ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे-युगे.’ हा श्लोक पोस्ट केल्याने आयएएस अधिकारी अवनीश यांनी यावर आक्षेप घेतला असून त्यावर प्रतिक्रिया दिली की, सॉरी मॅडम पण तुमच्यासारख्या वरिष्ठ पोलिसांकडून ही अपेक्षा नव्हती. डी. रूपा या सध्या रेल्वेमध्ये आयजीपी म्हणून कार्यरत आहेत. तर अवनीश शरण हे सध्या छत्तीसगढमधील कबीरधाम इथं जिल्हाधिकारी आहेत.

डी. रूपा यांनी अवनीश शरण यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं की, संस्कृतबद्दल तुमचा पुर्वग्रह दिसून आला. इथं धर्माचा अर्थ जे योग्य आहे त्याच्यासोबत उभा राहणं आहे. अनेक ठिकाणी पोलिसांचे ‘दुष्ट शिक्षक आणि शिष्ट रक्षक’ असं ब्रिद आणि लोगो वापरतात. याचा देखील अर्थ हाच आहे जो श्लोकामध्ये आहे. तसंच मी इतर कोणताही संदर्भ याच्याशी जोडलेला नाही असंही डी रूपा यांनी म्हटलं. एकंदरीत या ट्विटरवॉरमुळे लोकांमध्ये चर्चेला जागा निर्माण झाली आहे. जेव्हा दोन मोठे अधिकारी सोशल मीडियावर आपले मत मांडतात तेव्हा त्यांना फॉलो करणारे अनेक लोक असतात त्यांच्यामध्ये हा एक चर्चेचा विषय बनत असतो.

Visit : Policenama.com