IPS Deepak Pandey | नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या लेटरबॉम्बवर गृह विभाग नाराज, बजावली कारणे दाखवा नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (IPS Deepak Pandey) यांनी थेट महसूल खात्यावर (Revenue Department Maharashtra) लेटरबॉम्ब फोडल्यानंतर चांगलाच गदारोळ माजला. महसूल अधिकारी हे आरडीएक्स (RDX) सारखे आहेत तर कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate) यांचे अधिकारी डिटोनेटरसारखे (Detonator) आहेत. आरडीएक्स व डिटोनेटर मिळून जिवंत बॉम्ब (Live Bomb) बनतो, जो भूमाफिया त्यांच्या मार्जीप्रमाणे वापरत असल्याचा खळबळजनक आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे (IPS Deepak Pandey) यांनी केला होता.

 

पोलीस आयुक्त दीपक पांडे (IPS Deepak Pandey) यांनी लिहिलेल्या पोलीस महासंचालकांना (DGP) पत्राचे आज मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) पडसाद उमटले. आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकारी असे पत्र लिहू शकतो का? अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. पांडे यांनी लिहिलेलं पत्रच बैठकीत वाचून दाखवण्यात आले. आता या पत्रानंतर पोलीस आयुक्तांवर गृह विभागाने (Maharashtra Home Department) नाराजी व्यक्त करत कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे.

 

पांडेंनी घेतली संजय राऊतांची भेट
दरम्यान, पत्राने खळबळ उडाल्यानंतर दीपक पांडे गुरुवारी (दि.7) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या भेटीला पोहोचले. पत्रावरुन गदारोळ सुरु झाल्यानेच त्यांनी राऊत यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी भेटीनंतर आपण पत्रावर ठाम असल्याचे सांगितले. मी फार विचारपूर्वक पत्र लिहिलं असून जे मुद्दे मांडले आहेत ते सत्य असल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या पत्रामुळे कोण नाराज झाले असेल तर नाराजी दूर करु असेही त्यांनी म्हटले.

 

काय म्हटले पत्रात?
जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये (Land Related Crime) भूमाफिया (Land Mafia) हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन जागामालकांचा (Landlord) छळ करत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्स सारखे आहेत. तर कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकारी डिटोनेटरसारखे आहेत. आरडीएक्स आणि डिटोनेटर मिळून जिवंत बॉम्ब बनतो, जो भूमाफिया त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरत असल्याचा गंभीर आरोप नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik CP Deepak Pandey) यांनी केला आहे.

अधिकार काढून घेण्याची मागणी
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शहरीकरण (Urbanization), औद्योगिकरण (Industrialization), आधुनिकीकरणासाठी (Modernization)
महसूल अधिकाऱ्यांकडील कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

महसूल अधिकार काढून घेतल्यास…
भूमाफियांमुळे जागामालक हतबल व भयभीत झाले आहेत. इच्छा नसतानाही कमी दराने जागा विक्री करत आहेत किंवा भूमाफिया जागा बळकावत आहेत.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भूमाफिया हे काम करत आहेत.
त्यामुळे महसूलचे अधिकार काढून घेतल्यास भूमाफियांवर अंकुश ठेवता येईल, असेही पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

पोलीस आयुक्तांना जिल्हा दंडाधिकारी करा
नाशिक जिल्ह्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, (1951) चे कलम 7 नुसार पोलीस आयुक्तालयाचा दर्जा देऊन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 20(1) नुसार पोलीस आयुक्त यांना जिल्हा दंडाधिकारी म्हणून घोषित करण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे.

 

Web Title :- IPS Deepak Pandey | Maharashtra home department issued show cause notice to nashik police commissioner ips deepak pandey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर