IPS Deepak Pandey | लेटरबॉम्ब फोडणाऱ्या नाशिकच्या पोलिस आयुक्तांचा महसूल मंत्र्यांकडे माफीनामा; बाळासाहेब थोरात करणार CM ठाकरेंकडे तक्रार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Deepak Pandey | नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (IPS Deepak Pandey) यांनी थेट महसूल खात्यावर लेटरबॉम्ब फोडल्यानंतर चांगलाच गदारोळ माजला आहे, त्यानंतर आयुक्त पांडेय चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महसूल अधिकारी (Revenue Officer) ‘आरडीएक्स (RDX)’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू केली. महसूल अधिकारी त्यांच्या कक्षात आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे (CP) द्यावेत, अशी मागणी डिजीपींकडे (DGP) केली. यानंतर त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे सपशेल माफीनामा मागितल्याची माहिती मिळत आहे.

 

महसूलचे सर्व अधिकार स्वत:कडे मागणाऱ्या पोलीस आयुक्त दीपक पांडेय (IPS Deepak Pandey) यांच्या पत्रामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर या लेटरची मंत्री थोरात यांनी गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. असं सूत्राकडून सांगितलं जात आहे.

”कामकाजात सुधारणा करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याने शिफारशी केल्या, तर त्याचे केव्हाही स्वागत आहे.
मात्र, महसूल अधिकाऱ्यांना आणि या विभागाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यांना रुचले नाही.
याच पद्धतीने पोलीस विभागाचे मूल्यमापनही करता येते. सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) जामिनावर आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट तुरुंगात आहेत.
पुण्यात पोलिसांनी व्यापाऱ्यांचे अपहरण करून खंडणी मागितलीय.
बीटकॉईन घोटाळ्यात पोलीस अधिकारी सहभागी आहेत.
पोलिसांनी आधी आपल्या विभागाकडे लक्ष द्यावे.
वाळू, रेशनधान्य, भेसळयुक्त अन्नपदार्थ, परमीट रूम, हातभट्टीची दारू याचे काय होते, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे,”
अशा शब्दांत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केल्याचे समजते.

 

दरम्यान, आयुक्त पांडेय यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्याने पांडेय कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात थेट महसूल मंत्र्यांची सपशेल माफी मागितली आहे.
थोरात सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना पत्रातील भाषा चुकीची वाटत असेल, तर मी माफी मागतो.
या पत्रातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता.
फक्त 200 वर्षांपासून सुरू असलेल्या त्रुटी दूर करण्याचा हेतू आहे.
मी महसूल विभागाच्या विरोधात नाही.
या विभागाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, असं पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले आहेत.

 

Web Title :- IPS Deepak Pandey | nashik police commissioner deepak pandey apologizes to revenue minister balasaheb thorat for writing sensational letter

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा