इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने राज्यातील १० IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नगरच्या पोलिस अधीक्षकांचा ही समावेश आहे इशू सिंधू हे नगरचे नवीन पोलीस अधीक्षक असतील ते सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते. नगरचे पोलीस अधीक्षक शर्मा यांची नागपूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे. पी. व्ही. उगले (SP, ACB, नाशिक ते पोलीस अधीक्षक जळगांव), विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस अधीक्षक, गोंदिया), हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, SRPF, गट क्रमांक ६, धुळे), अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा), जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ते, पोलीस उपायुक्त, पुणे शहर), तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा), दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव ते (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई), इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ते पोलीस पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि रंजनकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, CID, नागपूर).

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १० आईपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या 

IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक 

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या 

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या 

राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या