IPS Krishna Prakash | पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश ‘नाराज’, म्हणाले – ‘माझी ही बदली नियमाला धरुन नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात नुकत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IPS Officers Transfer) करण्यात आल्या. यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad CP) कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची देखील बदली करण्यात आली. कृष्ण प्रकाश यांची अवघ्या 19 महिन्यात बदली करण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी साडेतीन वर्षे काम करुन आलो, त्याच ठिकाणी पुन्हा बदली केली, तीही कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच. माझी बदली नियमाला धरुन नाही, असे कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांनी सांगितले. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.

आयपीएस कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांनी सांगितले की, या बदली संदर्भात मुख्यमंत्री (CM), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पोलीस महासंचालक (DGP) यांना भेटणार आहे. परदेशात एका स्पर्धेसाठी गेले असताना कृष्ण प्रकाश यांची अचानक बदली करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी कृष्ण प्रकाश यांची प्रदेशातून येण्याची वाट न पाहता अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून (Addl CP) चोवीस तासांच्या आत पदभार स्विकारला.

कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर 2020 रोजी पिंपरी चिंचवड आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता.
कृष्ण प्रकाश हे विविध कारवाई, स्टिंग ऑपरेशन, वेषांतर यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.
परंतु 19 महिन्यातच त्यांची मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police, Mumbai)
पदावर बदली करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)
यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महासंचालकांना भेटणार

पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली केल्यानंतर त्यांनी ही बदली नियमाला धरुन नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
तसेच ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन बदलीचे कारण जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.

शरद पवारांची घेतली भेट

बदली झाल्यानंतर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी सकाळी बारामतीला जाऊन ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये शरद पवार यांच्या गोविंदबाग येथे दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली.
इतर वेळी प्रसारमाध्यमांना आवर्जून वेळ देणारे कृष्ण प्रकाश शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा न करता थेट मोटारीत बसून निघून गेले.

Web Title : IPS Krishna Prakash | Pimpri-Chinchwad’s Ex Commissioner of Police Krishna Prakash displeased, said – ‘My transfer does not follow the rules’

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR