IPS Krishna Prakash | पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांनी पोलीसनामा ऑनलाइनच्या (Policenama Online) कार्यालयास दि. 9 फेब्रुवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालया अंतर्गत राबविण्यात येणार्‍या अनेक मोहिमांबद्दल त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पोलीसनामा ऑनलाइन तसेच पुणे समाचारच्या टीम सोबत मनसोक्त बातचीत केली. (IPS Krishna Prakash)

 

 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेतीलच क्षेत्र नाही. तर चाकण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी, देहूरोड हा देखील परिसर येतो. सर्वांनी PCMC (पिंपरी-चिंचवड महापालिका) आणि PCPC (पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय) क्षेत्रातील फरक समजून घ्यायला हवा असं यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) म्हणाले. पुणे पोलिस आयुक्तालयातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, सांगवी, वाकड, हिंजवडी पोलिस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी व चाकण पोलिस ठाण्यांचा समावेश करून दि. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर चिखली पोलिस ठाणे नव्याने सुरू करण्यात आलेले आहे. कृष्ण प्रकाश हे पिंपरी-चिंचवडचे तिसरे पोलिस आयुक्त आहेत. (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash)

 

 

पोलीसनामा ऑनलाइनच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांनी स्टुडिओ, सर्व्हर रूमची पाहणी केली.
अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या पोलीसनामा ऑनलाइनच्या टीमबरोबर मनसोक्त बातचीत करताना त्यांनी काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीसनामा ऑनलाइनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title :- IPS Krishna Prakash | Visit of Pimpri Chinchwad Commissioner of Police Krishna Prakash to the office of Policenama

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा