IPS Mokshada Patil | लुटण्यासाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा ! महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बानावट ट्विटर अकाऊंट, देशातील अनेक IPS अधिकाऱ्यांना गंडा

 IPS Mokshada Patil | chhatrapati sambhaji nagar a fake twitter account in the name of ips officer mokshada patil cheating of ips officers across the country
file photo

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Mokshada Patil | सर्वसामान्यांना मोठमोठ्या सेलिब्रिटी, व्यापारी, उद्योजक यांना गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminals) अनेक युक्त्या वापरल्या जातात. सायबर गुन्हेगारांनी चक्क एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या (Woman IPS Officer) नावानेचे बनावट ट्विटर अकाउंट (Fake Twitter Account) तयार करुन देशातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक (Chhatrapati Sambhaji Nagar Railway SP) मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या नावाने हे बनावट ट्विटर अकाउंट उघडण्यात आले आहे.

एका सायबर गुन्हेगाराने आयपीएस मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार केले. त्यानंतर या खात्यावरुन सायबर गुन्हेगाराने (Chhatrapati Sambhajinagar Crime) एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट (Liver Transplant) केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची पोस्ट टाकली. तसेच या मुलीच्या उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपाचर सुरु असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्युआर कोड ट्विट करुन व्हायरल केला. हे ट्विटर अकाउंट महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी पैसे पाठवून मदत केली.

दरम्यान, या बनावट ट्विटर अकाऊंटची माहिती मोक्षदा पाटील यांना समजली. त्यांनी तात्काळ लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून हे खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळवले. अनेक ठिकाणाहून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर मंगळवारी (दि.27) रात्री 11 वाजता हे खाते बंद करण्यात आले. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु केला आहे. यावर बोलताना मोक्षदा पाटील म्हणाल्या, ट्विटरवर माझे कोणतेही खाते नसून, नागरिकांनी सायबर भामट्यांचा पोस्टला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोण आहेत मोक्षदा पाटील…

आयपीएस मोक्षदा पाटील यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांनी आजपर्य़त ज्या-ज्या ठिकाणी काम
केले तिथे त्यांच्या कामाची चर्चा झाली. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक असताना
त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची मोठी चर्चा होती. मोक्षदा पाटील यांचे पती आस्तिककुमार पांडेय
(IPS Astik Kumar Pandey) हे देखील आयपीएस अधिकारी असून ते छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हाधिकारी (Collector) आहेत. सध्या मोक्षदा पाटील या छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग अधीक्षकपदावर
कार्यरत आहेत.

Web Title :- IPS Mokshada Patil | chhatrapati sambhaji nagar a fake twitter account in the name of ips officer mokshada patil cheating of ips officers across the country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’